AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकातील पाणी व्यवस्थापन
रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पिक आहे अनेक शेतकरी हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाच्या ओलीचा फायदा घेऊन हरभरा पिकाची पेरणी करतात व चांगले उत्पन्न घेतात.हरभरा पिकाचे जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाणी व्यवस्थापन ह्या लेखाचा निश्चितच फायदा होईल
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकला फुले येऊ लागताच पाणी द्यावे.बागायती शेताची रान बांधणी करताना दोन साऱ्यामधील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा तसेच लांबी सुद्धा उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्याचे सोयीचे होते.मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पाणी ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे.भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात ३० ते३५ दिवसांनी पहिले व ६० ते ६५ दिवसांनी दुसरे पाणी द्यावे हरभरा पिकाला साधारणपणे २५ सेंमी पाणी लागते प्रत्येक पाणी प्रमाणशीर देणे गरजेचे आहे . जास्त पाणी दिल्यास पिक उभळण्याचा धोका असतो .जमिनीच्या खोली नुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये प्रमाणशीर अंतर ठेवावे .एक पाणी दिल्यास ३० टक्के,दोन पाणी दिल्यास ६० टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते. तुषार सिंचन – हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते हे पिक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्यामुळे जास्त पाणी झाल्यास पिक उभळते व उत्पादनात मोठी घट होते त्यासाठी ह्या पिकास तुषार सिंचन हि अतिशय योग्य पद्धत आहे. या पद्धतीमुळे या पिकास पाहिजे तेवढे पाणी देता येते.तसेच पिकात तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.तुषार सिंचन पद्धतीमुळे पाणी प्रमाणात देता येत असल्यामुळे मूळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते. अग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस २ नोव्हेंबर १७
298
2
इतर लेख