सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
बटाटा पिकामधील पाणी व्यवस्थापन
• पिकाची पाण्याची एकूण गरज जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५० ते ६० सेंमी एवढी आहे.
• कमी कालावधीच्या जातींना कमी पाणी लागते तर जास्त कालावधीच्या जातींना जास्त पाणी लागते. पिकाला उपलब्धतेच्या ६० टक्के ओलावा जमिनीत असेल त्यावेळी पिकांना पाणी द्यावे.
• पिका वाढीच्या संवेदनशील अवस्था म्हणजेच रोपावस्था, स्टेलोनायझेशन, बटाटा मोठे होण्याची अवस्था या काळात पाण्याचा पुरवठा करावा.
• पहिले पाणी हलके आणि लागवडी नंतर ४ ते ७ दिवसांनी द्यावे.
• बटाटे पोसू लागल्यावर भरपूर पाणी द्यावे. मध्यम जमिनीत ७ दिवसांच्या अंतराने एकूण १२ पाण्याचा पाळ्या द्याव्यात._x000D_
• ओलितासाठी सरी वरंबा किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. बटाट्याची मुळे जास्तीत जास्त ६० सेंमी पर्यंत खोल जातात. जवळजवळ ७०% पाणी वरच्या ३० सेंमी थरातून शोषून घेतात. उर्वरित ३० टक्के पाणी खालच्या थरातून शोषतात._x000D_
_x000D_
संदर्भ –अॅग्रोस्टार अग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस १२ डिसेंबर १८