ऊन्हाळ्यात सीताफळ बागेसाठी पाणी व्यवस्थापन
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊन्हाळ्यात सीताफळ बागेसाठी पाणी व्यवस्थापन
• सीताफळ बागेस साधारणपणे सकाळी ६ ते ८ या काळात सिंचन करावे. त्यामुळे आर्द्रता व्यवस्थापन व पाण्याचा पुरेपूर वापर पराग सिंचनासाठी होतो. फळांची वाढही समाधानकारक होते. • सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. त्यामुळे पाण्याची ५० ते ७० टक्के बचत होते. झाडाच्या दोन्ही बाजूंनी दोन लॅटरल्स टाकाव्यात. त्याचबरोबर प्रत्येक लॅटरलवर दोन ड्रिपर्स ठेवावीत. यामुळे झाडाच्या मुळांच्या विस्ताराच्या क्षेत्रात समप्रमाणात पाणी मिळून पाण्याची संपूर्ण मात्रा पिकास उपयोगी पडते. अन् पाण्याची बचतही होते. • पाण्याची बचत व पिकाकडून प्रभावी वापर होण्यासाठी बागेमध्ये सेंद्रिय किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा. आच्छादन झाडाच्या बुंध्याभोवती करावे.
• सेंद्रिय आच्छादनाचा वापर करायचा असल्यास प्रति झाड ८-१० किलो उसाचे पाचट व वाळलेल्या गवताचा वापर करावा. सेंद्रिय आच्छादनाची अधिक उपलब्धता असल्यास झाडाच्या विस्ताराची (कॅनॉपी) सावली जेथेपर्यंत पडते तेथेपर्यंत सेंद्रिय आच्छादन करावे. कारण झाडाची मुळे तिथपर्यंत पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण करीत असतात. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
482
12
इतर लेख