क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताअॅग्रोवन
देशातील धरणसाठा २९% वर
नवी दिल्ली: वाढत्या उन्हामुळे देशातील धरणसाठ्यांत कमालीची घट झाली आहे. देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये सध्या ४६.५१३ अब्ज घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण क्षमतेच्या केवळ २९ टक्के पाणी सध्या उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १२.५ टक्के तर दहा वर्षाच्या सरासरीच्या केवळ ३.० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती राष्ट्रीय पाणी आयोगाने दिली. देशातील उत्तर, दक्षिण आणि मध्य भारतात पाणीसाठ्याची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे, तर पूर्व आणि पश्‍चिम भारतात पाणीपातळीत घट झाली आहे. उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये गेल्या वर्षी याच काळात या राज्यांतील जलाशयांमध्ये केवळ २० टक्के साठा शिल्लक होता. म्हणेजच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २९ टक्के जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. पूर्व भारतातील झारखंड, ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये सध्या केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत या चारही राज्यांतील जलायशयांमध्ये ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये सध्या २० टक्के साठा शिल्लक आहे.
गेल्या वर्षी याचा काळात १७ टक्के पाणीसाठा होता. गुजरात व माहाष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये २१ टक्के पाणीसाठा शिल्ल्क आहे. गेल्या वर्षी याच काळात जलाशयांमध्ये २८ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यात ७ टक्के घट झाली आहे. मध्य भारतातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चारही राज्यांतील महत्त्वाच्या जलाशयांमध्ये २९ टक्के पाणीसाठा होता. यंदा ३२ टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. संदर्भ – अॅग्रोवन, १४ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
15
0
संबंधित लेख