क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
मान्सून समाचारअॅग्रोवन
मान्सूनची प्रतिक्षा संपणार!
पुणे: अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मान्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मान्सूनच्या आगमनाला ही स्थिती पूरक ठरल्याने आज किंवा उदया मान्सून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोनच दिवसांत मान्सून पुण्यासह राज्याच्या आणखी काही भागात प्रगती करण्यास पोषक हवामान आहे.
अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर असलेल्या वायू चक्रीवादळामुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम झाला. वादळ निवळल्यानंतरही अरबी समुद्रावरील शाखेचे प्रवाह मंदच असल्याचे दिसून आले आहे. मान्सूनने अपेक्षित चाल केली नसून, महाराष्ट्रातील आगमन शुक्रवारपर्यंत लांबण्याची यापूर्वीच वर्तविली होती. मान्सूनने १४ जून रोजी दक्षिण कर्नाटकपर्यंतची वाटचाल पूर्ण केली असून, बुधवारीदेखील प्रगतीची सीमा कायम होती. आता मान्सूनच्या आगमनास बळकटी मिळाली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, २० जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
111
0
संबंधित लेख