क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
हवामान बदल हे जगासमोरचे आव्हान
नवी दिल्ली: देशाच्या प्रगतीमध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. देशातील अन्नसुरक्षा राखण्यात ते महत्वाची भूमिका बजावत असल्याचे मत उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी डब्ल्यूआरआय इंडियाने आयोजित केलेल्या ‘कनेक्ट करो’ या वार्षिक समारंभात मांडले. नायडू म्हणाले, कृषी क्षेत्र अधिक फायदेशीर होण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांच्या मालाला अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या पाहिजेत. निसर्गाच्या संवर्धनासाठी विकासाच्या धोरणात सुधारणा करण्याची गरज असून, त्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे.
हवामान बदल हे संपूर्ण जगासमोरचे आव्हान आहे. निसर्गाचे संतुलन साधण्यासाठी सरकार, जनता, खासगी क्षेत्र सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. वृक्षारोपण, स्वच्छता, स्त्रीशिक्षण याविषयी जनजागृती करणे महत्वाचे आहे. निसर्गसंवर्धनाचे धडे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून दिले पाहिजेत. आर्थिक विकासाशी तडजोड न करता कार्बन उत्सर्जन कमी करणारे विकासाचे मार्ग जाणीवपूर्वक अवलंबण्याची, नैसर्गिक संसाधनांचा वापर न्याय्य आणि संवेदनशीलतेने करण्याचा सल्ला उपराष्ट्रपतींनी यावेळी दिला. संदर्भ – ३० मार्च २०१९, कृषी जागरण जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
133
0
संबंधित लेख