क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनअॅग्रोवन
योग्य वेळी लसीकरण करा!
जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न पाहता ठरलेल्या वेळापत्रकानुसार लसीकरण करावे. रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना क्षार व जीवनसत्त्वाचा पुरवठा करावा._x000D_ लसीकरणाचा फायदा -_x000D_ • रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न पाहाता वेळापत्रकानुसार लसीकरण करावे._x000D_ • रोगाची साथ येण्यापूर्वी लसीकरण केल्यामुळे दोन ते तीन आठवडे रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लागतात._x000D_ • रोगाची साथ येण्यापूर्वीच जनावरांच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते त्यामुळे पुढे होणारे नुकसान ही टाळता येते._x000D_ लसीकरणासाठी योग्य वय -_x000D_ • घटसर्प व फऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण सहा महिन्यांची वासरे किंवा मोठ्या वयाच्या जनावरांना करावे._x000D_ • लाळ्या खुरकूत रोगाचे लसीकरण जर वासराच्या आईला केले नसेल, तर सहा ते सात आठवडे वयाची वासरे आणि त्यापुढील जनावरांना करावे._x000D_ • आंत्रविषार रोग नियंत्रणाची लस वासराच्या आईला दिली नसेल, तर ती वासराच्या पहिल्या आठवड्यात द्यावी. लस दिली असेल तर चार ते सहा आठवडे वयाच्या वासराला द्यावी.
रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर घ्यावयाची काळजी - • आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवून जागेवरच चारा, पाणी द्यावे. चाऱ्यासाठी बाहेर सोडू नये. • डबके, नदीनाल्यातील पाणी पाजू नये. • रोगाचा संसर्ग झालेल्या जनावरांना वेळेत उपचार करावेत. • रोगाची साथ आलेल्या भागात जनावरे नेऊ नयेत. त्या भागातील जनावरे इतर ठिकाणी नेऊ नयेत. • रोगाची साथ आलेल्या भागातील बाजार, प्रदर्शने बंद ठेवावीत. • मेलेले जनावर तसेच दूषित मलमूत्र, चारा यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी. • जनावरांच्या गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे. संदर्भ - अॅग्रोवन
384
0
संबंधित लेख