AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी वापरा मांडव पद्धत
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठी वापरा मांडव पद्धत
वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या वेलीला योग्य पद्धतीने आधार व वळण दिल्यास पिकांची वाढ चांगली होते त्याप्रमाणे उत्पादनही दर्जेदार मिळते. वेलांना आधार व वळण देण्याची पद्धत - • बिया टोकणीनंतर १० ते १५ दिवसात रोपे उगवुन येतात. • उगवणी नंतर चांगले जोमदार वाढलेले एक रोप ठेवून बाकी रोपे काढून टाकावीत. • वेलींच्या जवळ एक फूट उंचीच्या काड्या रोवून घ्याव्यात.रोवल्यानंतर काड्यांना सुतुळी वेलीच्या अगदी वरून आडव्या जाणाऱ्या तारांना बांधाव्यात. • सुतळीच्या पिळ्यामधून वेळोवेळी वेली ओढून घ्याव्यात वाऱ्याच्या हेल्काव्याने वेली खाली पडणे टाळता येते. • मुख्य वेलीची वाढ होण्यासाठी बगल फूट काढणे गरजेचे आहे.वेल तारेच्या खाली एक फुटावर आल्यावर बगल फूट काढणे बंद करावे.वेळी त्यांनतर ३ ते ४ फूट मांडवाच्या तारेवर आडव्या पसरून घ्याव्यात.
मंडप उभारण्याचे फायदे – • वेलवर्गीय भाजीपाल्याट वेलीला आधार दिल्यास तिची वाढ चांगली होते.वेळी ६ ते ७ महिने चांगल्या राहतात.जमिनीवर केवळ ३ महिने चांगल्या राहतात. • वेलवर्गीय भाजीपाला पिकाचे पाने व फळे यांचा संपर्क जमिनीशी होत नाही.हवा चांगल्या प्रकारे खेळती राहत असल्याने सडण्याचे,कीड व रोगाचे प्रमाण कमी राहते. • फवारणीसुद्धा व्यवस्थित करता येते वेलवर्गीय भाजीपाला पिकातील व्यवस्थित वाढ होऊन फळांचा रंग व गुणवत्ता चांगली राहते. • फळांची तोडणी व खुरपणी सुलभ रीतीने होते. • पिकांत दोन ओळीमध्ये कमी कालावधीचे १ ते २ महिन्याचे अंतरपिक घेता येते. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
375
5
इतर लेख