कीटक परोपजीवी सुत्रकृमींचा कीड नियंत्रणात वापर
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कीटक परोपजीवी सुत्रकृमींचा कीड नियंत्रणात वापर
वातावरणात विविध प्रकारचे उपयुक्त सुक्ष्मजीव उपलब्ध असून कीड-रोग नियंत्रणात देखील चांगले कार्य करत असतात, अशाच काही उपयुक्त सुक्ष्म जीवांचा वापर करुन त्याद्वारे जैविक नियंत्रण केले जाते. _x000D_ सुत्रकृमींच्या काही प्रजाती ह्या ज्या कीटकांच्या शरीरात वाढून कीटकास आजार निर्माण करुन त्यांना मारतात, त्यास ‘कीटक परोपजीवी सुत्रकृमी-एन्टामोपॅथोजेनिक निमेटोड’ (ई.पि.एन.) म्हणतात. ह्या सुत्रकृमीद्वारे कीड निय़ंत्रण होण्याची प्रक्रिया कीटक परोपजीवी बुरशी प्रमाणेच असते. कीटकपरोपजीवी सुत्रकृमी हे वनस्पतीस नुकसान पोहचविणा-या सुत्रकृमीपेक्षा आकाराने थोडे मोठे असतात. हेट्रोरॅब्डीटीस, स्टेनरनेमा, फोटोरॅब्डीटीस ह्या कीटकपरोपजीवी सुत्रकृमींच्या वर्गातील काही प्रजाती कीटकांच्या शरिरात प्रवेश करुन कीटकास नष्ट करतात. झेनोरॅब्डीस सारख्या सहजीवी जीवाणूच्या मदतीने स्टेनरनेमा सारख्या प्रजाती कीटकांना नियंत्रणात आणण्यात अधिक चांगल्या प्रकारे मदत करतात. शरीरात प्रवेश केल्यानंतर सर्वच पेशींवर सुत्रकृमी झपाट्याने वाढतात, संपूर्ण शरीर रोगग्रस्त केले जाते. ३ ते ५ दिवसात कीड मरुन जाते, अशा मेलेल्या किडींच्या शरिरातून बाल्यावस्था पुन्हा नविन यजमान किडीच्या शोधात निघतात, पुन्हा इतर किडींना संसर्ग करण्यास सुरुवात करतात. _x000D_ याचा वापर उपलब्ध फ़ॉर्म्युलेशन्सनुसार फ़वारणीद्वारे करता येतो. किडीच्या शरिराच्या सहजपणे संपर्कात येईल अशा पध्दतीने वापरल्यास जलद परिणाम दिसून येतात. हुमणी सारख्या जमिनीत राहणा-या किडींच्या संपर्कात येण्यासाठी मातीमध्ये आळवनी किंवा सेंद्रिय खतामध्ये मिसळून तसेच ड्रिपद्वारे देखील देता येते. त्याचबरोबर याच्या वापरामुळे हुमणी, नारळावरील गेंड्या भुंगा, नारळ वर्गीय पिकांचे नुकसान करणारे भुंगेरे, केळीचे खोड पोखरणारा भुंगा, द्राक्षे, आंबा, संत्रा पिकात खोड पोखरणारी कीड, खोड किडा, घाटे अळी, अमेरिकन लष्करी अळी, पाने खाणा-या अळ्या, जमिनीतून झाडाची मुळे खाणा-या अळ्या, भाजीपाला पिकातील पाने खाणारे, फ़ळ पोखरणाऱ्या पतंग वर्गीय अळ्यांचे अशा विविध वर्गातील किडींचे नियंत्रण होते._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ _x000D_ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
123
0
इतर लेख