AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
UPI फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे!
समाचारAgrostar
UPI फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे!
➡️ ऑनलाइन पेमेंटसाठी वापरकर्ते युपीआय अधिक वापरत आहेत. युपीआयद्वारे पेमेंटची संख्या वाढल्याने बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. ➡️ देशात ऑनलाइन पेमेंट वेगाने वाढले आहे. यामध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस (युपीआय) द्वारे पेमेंट ही सर्वात लोकप्रिय पद्धत आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी वापरकर्ते युपीआय अधिक वापरत आहेत. युपीआयद्वारे पेमेंटची संख्या वाढल्याने बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तुम्हीही युपीआयद्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज आपण युपीआय पेमेंटद्वारे होणारी फसवणूक कशी टाळता येऊ शकते हे जाणून घेऊया. ➡️ युपीआय फसवणूक टाळण्यासाठी ५ सोपे उपाय : 👉कोणत्याही ग्राहक सेवा कॉलवर किंवा मेसेजवर तुमचा युपीआय आणि पिन कधीही शेअर करू नका. मग त्यांनी सरकारी संस्था, बँक किंवा ज्ञात कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा दावा केला असेल तरीही आपले डिटेल्स शेअर करू नका. तसेच बँकेतून किंवा इतर कंपनीतून आलेले कॉल आणि मेसेज तपासा. जर त्यांनी बँक तपशील आणि पिन किंवा ओटीपी विचारला तर ते फसवणुकीशी संबंधित प्रकरण असू शकते. 👉यासोबतच तुमच्या मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरचा अॅक्सेस कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका. तसेच केवायसी करण्याचा दावा करणान्यांना तुमची माहिती देऊ नका आणि तुमचे बँक तपशीलही अपडेट करू नका. 👉अतिरिक्त पैसे, कॅशबॅक किंवा वेगवेगळे फायदे देण्याचे आमिष दाखवणान्या अज्ञात वेबसाइटवरून व्यवहार करू नका. अनेकदा अशा वेबसाइट्सवरून ग्राहकांना १ स्यया पाठवण्यास सांगितला जातो. जर तुम्ही त्यांच्या सापळ्यात अडकून १रुपया पाठवला तर तुमचा पिन त्यांच्याकडे जाईल आणि तुमचे खाते काही वेळातच रिकामे होईल. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना खात्री करून घ्या. 👉दर महिन्याला तुमचा युपीआय पिन बदलत राहा. तुम्ही तसे करू शकत नसल्यास. तुमचे खाते सुरक्षित करण्यासाठी दर तीन महिन्यांनी पिन बदलत रहा. 👉याशिवाय. तुम्ही युपीआय पिनसह दैनंदिन व्यवहाराची मर्यादा मर्यादित करू शकता. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
3
इतर लेख