AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
भारतासोबतच आशियाई देशालादेखील ‘या’ अळीचा खतरा
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
भारतासोबतच आशियाई देशालादेखील ‘या’ अळीचा खतरा
भारतासोबतच म्यानमार, चीन, थायलंड, बांग्लादेश, श्रीलंका या देशामध्ये ‘लष्करी अळी’चा खतरा वेगाने पसरत आहे. ही अळी मक्का, भात, कापूस व ऊस यासारख्या विविध १८० झाडांच्या प्रजातींना नष्ट करू शकतात. संयुक्त राष्ट्र खाद्य व कृषी संघटनेने भारतासहित संपूर्ण आशियाई देशांना ‘लष्करी अळी’पासून धोका असल्याचे सांगितले आहे. ही कीड संपूर्ण पिकांचा नाश करू शकते. बँकाकमध्ये आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्राच्या खादय व कृषी संघटनेच्या बैठकीत भारतासहित संपूर्ण आशियाई देशांना लष्करी अळीपासून सावधान होण्यास सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राच्या खादय व कृषी संघटनेचे
उपमहानिरीक्षक कंधवी कदिरेसन यांनी सांगितले की, ‘लष्करी अळी मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेपासून ते आफ्रिकेपर्यंत पोचली आहे. आता ही अळी वेगाने आशियाई देशांमध्ये पसरत आहे. ही अळी २०१८ ला भारतामध्ये जुलै या महिन्यात आढळली होती. आता, ही अळी म्यानमार, चीन, थायलँड, बांग्लादेश, श्रीलंका या आशियाई देशामध्ये वेगाने पसरत आहेत. या अळीमुळे संपूर्ण शेती नष्ट होऊ शकते. याबाबत सर्व देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करुन पिकांना वाचवले पाहिजे. ही अळी मक्का, भात, कापूस व ऊस यासारख्या विविध १८० झाडांच्या प्रजातींना नष्ट करू शकतात. या अळीची प्रजनन क्षमता जास्त आहे. यामुळे ही अळी मका, भात व ऊसाच्या पिकांना रातोरात नष्ट करू शकते.” संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २२ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
2
0