कृषी वार्ताकृषी जागरण
पीएम किसान योजनेंतर्गत त्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम मिळणार आहे, ज्यांना आतापर्यंत लाभ मिळालेली नाही!
• प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हळूहळू २ हजार रुपयांची रक्कम पोहचण्यास सुरूवात करण्यात आली आहे. कोरोनामधील संकटापासून मुक्त होण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २७ मार्च रोजी १.७ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. हे पाहता त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आणि म्हणाल्या, _x000D_ • “पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये रक्कम मिळणार आहे. या घोषणे अंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पाठवला केला जात आहे. ”_x000D_ • तथापि, अद्याप देशात अनेक शेतकरी पीएम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. वास्तविक कारण असे आहे की अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या नोंदणीला अद्याप मान्यता मिळाली नाही. परंतु आपल्या माहितीसाठी कळविले जात आहे की अशा शेतकर्‍यांना चिंता करण्याची गरज नाही. पीएम किसान योजनेच्या नियमांनुसार आपण नोंदणीसाठी अर्ज केला असेल आणि नोंदणी झाली नसेल किंवा कोणत्याही चुकीमुळे नाकारले गेले असेल तर जेव्हा मान्यता मिळेल तेव्हा तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील._x000D_ _x000D_ 1) पंतप्रधान किसान योजनेचे पैसे एकाच वेळी प्राप्त होतील._x000D_  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार https://pmkisan.gov.in डिसेंबर ते मार्च या ४ महिन्यांच्या कालावधीत एखाद्या शेतकर्‍याची नोंद झाली असेल आणि आतापर्यंत खात्यावर पैसे आले नसतील तरीही त्यांची नोंदणी स्वीकारली जाईल, त्यानंतर मागील मुदतीची रक्कम आणि एप्रिल महिन्याचेदेखील त्यांच्या खात्यात जमा होतील._x000D_ _x000D_ संदर्भ:- कृषी जागरण ९ एप्रिल २०२०_x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा._x000D_
660
0
संबंधित लेख