AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
TVS ची भन्नाट ऑफर !
ऑटोमोबाईलAgrostar
TVS ची भन्नाट ऑफर !
➡️आताच्या घडीला भारतीय बाजारपेठेत स्वदेशी कंपन्यांचा बोलबाला असल्याचे दिसून येत असून, तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातील एक आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी म्हणजे TVS. ➡️स्विमर टीव्हीएस कंपनीने आपल्या एका बाइकवर भन्नाट ऑफर आणली आहे. TVS ही प्रचंड लोकप्रिय बाइक असून, गेल्या १५ वर्षांमध्ये ग्राहकांची मोठी पसंती मिळाली आहे. आतापर्यंत या बाइकच्या ३० लाखांहून अधिक मॉडेल्सची विक्री झाली आहे. ही लोकप्रिय बाइक म्हणजे TVS Star City Plus या बाइकमध्ये ईटीएफआप किंवा इको-प्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान देण्यात आले आहे, ज्यामुळे ही बाइक पूर्वीपेक्षा १५ टक्के अधिक फ्युएल इफिशियंट बनते. ➡️TVS मोटर कंपनी या बाइकवर २१०० रुपयांचा कॅशबॅक आणि ३००० रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे. मात्र, ऑफरमध्ये काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत. तुम्ही ही बाइक घेण्याचा विचार करत असाल, तर एक उत्तम संधी तुमच्यासाठी आहे.TVs Star City Plus च्या ड्रम वेरिएंटची किंमत ७०,२०५ रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे, तर या बाइकच्या डिस्क व्हेरियंटची किंमत ७३,९५५ रुपये आहे. ➡️TVs Star City Plus मध्ये 110cc, सिंगल सिलेंडर, फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. या बाइकचे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्ससह सुसज्ज आहे. TVS Star City Plus या बाइकला ९०kmph चा टॉप स्पीड मिळतो. या बाइकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन देण्यात आले आहे.TVS Star City Plus च्या मागील बाजूस ५-स्टेप अॅडजस्टेबल रिअर शॉक देण्यात आले आहेत. यात १७-इंचांचे व्हील आहे, जे ट्यूबलेस टायर्ससह येते. ➡️ही बाइक खरेदी करण्यापूर्वी, जवळच्या डीलरशिपवर जाऊन ऑफर पूर्णपणे समजून घेणे उपयुक्त ठरू शकेल. त्यानंतरच व्यवहार करावा. याशिवाय ही ऑफर मर्यादित काळासाठी असल्याचे सांगितले जात आहे. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
3