AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वाळवेच्या पूर्व नियंत्रणासाठी गहू बियाण्यास बीजप्रक्रिया करणे
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वाळवेच्या पूर्व नियंत्रणासाठी गहू बियाण्यास बीजप्रक्रिया करणे
हिवाळ्यातील धान्य पीक म्हणून काही राज्यात गहू पिकाची लागवड केली जाते. या पिकाची लागवड जिरायती किंवा बागायती सिंचनासाठी देखील केली जाते. यंदा मान्सून चांगला व पुरेसा पाऊस झाल्याने बिगर सिंचित क्षेत्रामध्ये हे पीक घेणे शक्य होईल. पिकाची उगवण झाल्यानंतर वाळवी किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. भारी काळ्या मातीमध्ये साधारणपणे या किडींचा प्रादुर्भाव कमी असतो. या किडींमुळे वालुकामय, चिकणमातीत अधिक नुकसान होते. वाळवीची मादी वर्षानुवर्षे अंडी घालते आणि मातीमध्ये ७ - ८ फूट खाली राहते. त्यामुळे या मादी किडींचे नियंत्रण करणे अशक्य आहे. एकदा, वाळवी मादी कीड शेतीमध्ये स्थायिक झाल्यावर दरवर्षी हा उपद्रव पिकामध्ये दिसून येतो. वाळवी किडी जमिनीलगत पिकाच्या बुंधा आणि मुळ्यांवर प्रादुर्भाव करते. परिणामी गहूची ताटे (रोपे) पिवळे पडून वाळून जातात, अशी प्रादुर्भावग्रस्त ताटे सहजपणे मातीतून खेचली जाऊन त्यावर ठिपके दिसून येतात. बागायती क्षेत्रामध्ये या किडींचा अधिक प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. ही कीड पिकाच्या सुरूवातीच्या वाढीच्या व लोंबी अवस्थेतदेखील प्रादुर्भाव करते.
गहू पेरणीपूर्वी पुढील उपाययोजना करावी._x000D_ • गहू पेरणीपूर्वी शेतीतील पूर्वीच्या पिकाचे अवशेष काढा व नष्ट करा._x000D_ • शेतीमध्ये फक्त कुजलेल्या शेणखताचा वापर करावा._x000D_ • शेणखत उपलब्ध नसल्यास त्याऐवजी एरंड, करंज किंवा निंबोळी पेंड यांचा वापर करावा._x000D_ • गहूची पेरणी करण्यापूर्वी वाळवी किडींच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी बायफेंथ्रिन १० ईसी @२०० मिली किंवा फिप्रोनिल ५ एससी @५०० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी @४०० मिली या प्रमाणात घेऊन ५ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करावे. त्यानंतर हे बियाणे पक्क्या कोब्यावर (फरशीवर) किंवा प्लॅस्टिकच्या पत्र्यावर पसरावे आणि तयार द्रावणाची फवारणी करावी. हातामध्ये रबराचे हातमोजे घाला आणि बियाणे चांगले घोळून घ्यावेत. उपचारित बियाणे वाळवण्याकरिता रात्रभर ठेवावे व दुसऱ्या दिवशी सकाळी पेरणीसाठी वापरावे._x000D_ • जर बीजप्रक्रिया केली नाही आणि वाळवीचा प्रादुर्भाव दिसून आला, तर १०० किलो वाळूमध्ये फिप्रोनील ५ एससी १.५ लिटर किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी १.५ लिटर मिसळून उभे पिकामध्ये टाकावे आणि हलके पाणी द्यावे._x000D_ • नियमित सिंचन देऊन पिकामध्ये ओलावा कायम ठेवावा. _x000D_ डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
631
3
इतर लेख