AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ‘हा’ निर्णय
कृषी वार्तापुढारी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी ‘हा’ निर्णय
नवी दिल्ली – पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बॅंक खात्यासोबत जोडण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती परिषदेत दिली.
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी किसान सन्मान निधी योजना जाहीर केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तीन हप्त्यांमध्ये ६ हजार रूपये वर्ग केले जाणार आहे. आतापर्यंत दोन हप्ते वर्ग करण्यात आले असून, उर्वरित तिसरा हप्ता लवकरच वर्ग केला जाणार आहे. काही ठिकाणी बॅंक खात्याशी आधार कार्डची जोडणी नसल्यामुळे अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर आधाकर कार्ड जोडणीसाठीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे जावडेकर यांनी सांगतिले. संदर्भ – पुढारी, १० ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
226
0