AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात थंडीची चाहूल लागेल
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
राज्यात थंडीची चाहूल लागेल
महाराष्ट्रावरील हवेचे दाब पाहता, ईशान्य भारताकडून वाहणारे वारे हे कोरडे असल्याने आकाश अंशत: ढगाळ राहील. या कारणाने राज्यात पावसाची शक्यता नाही. १५ नोव्हेबरला वातावरणातील बदलाने उत्तर कोकण, घाटमाथा व घाटमाथ्याचे पश्चिम राज्याकडील जवळच्या भागात हलक्या पावसाची शक्यता असून, त्यानंतर फारसे हवामान बदल जाणविणार नाही. हवामान स्थिर राहील. थंडीची चाहूल लागेल. हळूहळू किमान तापमानात घसरण होऊन सकाळी व पहाटे थंड राहील. काही भागात हवेत आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहिल्यास धुके जाणवेल. हंगामात बदल होऊन हिवाळा सुरू होईल. वाऱ्याचा वेग अत्यंत कमी राहील. आकाश निरभ्र राहील. प्रखर सुर्यप्रकाश जाणवेल. रब्बी हंगाम सुरू झालेला असेल.
कृषी सल्ला:_x000D_ १. पाऊस उघडल्याने, जमिनीवरील खरीप पिकांची काढणी करून, जमिनीची पुर्वमशागत करून रब्बी पिकांच्या पेरण्या कराव्यात. _x000D_ २. बागायत क्षेत्रात गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करा. _x000D_ ३. रब्बी हंगामात हरभरा पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. _x000D_ ४. १५ नोव्हेंबरपर्यंत पुर्व हंगामी ऊसाची लागवड करून हरभरा, कोबी, फ्लॉवर, झेंडू इ. आंतर पिके घ्यावीत. _x000D_ ५. रबी हंगामात कांदा पिकाचे रोप तयार करून लागवड करावी. _x000D_ ६. मिरचीची लागवड रबी हंगामात करावी. _x000D_ _x000D_ संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे_x000D_ _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
60
0