AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात काही भागात गारठा सुरू
मान्सून समाचारअॅग्रोवन
राज्यात काही भागात गारठा सुरू
पुणे – राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी होण्यास सुरूवात झाली आहे. पहाटे पडणारे धुके, दव यामुळे तापमानाचा पारा वेगाने घसरू लागला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात तापमान 20 अंशांच्याखाली उतरले आहे. आजपासून राज्यात थंड व कोरडया हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, थंड वारे मध्य व पश्चिम भारतातील राज्यांकडे येऊ लागले आहे. किमान तापमानात आणखी 2 ते 4 अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तापमानात घट होऊ लागली आहे. विदर्भ, मराठवाडयासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमान वेगाने कमी होत असल्याने गारठा वाढला आहे. संदर्भ – अॅग्रोवन, 11 नोव्हेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
46
0