कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
साखर उत्पादन 265 लाख टन होण्याची शक्यता
ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या चालू गाळप हंगामात 2019-20 मध्ये साखर उत्पादन 265 लाख टन होण्याचा अंदाज आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आयएसएमए) च्या मते साखर उत्पादन पूर्वीच्या अंदाजापेक्षा पाच लाख टन होण्याची शक्यता आहे._x000D_ इस्माने आपल्या सुरुवातीच्या उत्पादन अंदाजानुसार देशात 260 लाख टन साखर उत्पादनचा अंदाज वर्तविला होता, जे मागील वर्षीच्या 330 लाख टनापेक्षा 70 लाख टन कमी होते. इस्माव्दारे प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशमधील साखर उत्पादन मागील गाळप हंगाम 2018-19 च्या तुलनेत जवळपास 118 लाख टन होण्याचा अंदाज आहे._x000D_ अवकाळी पाऊस, पूर आणि दुष्काळामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात ऊस पिकाचे नुकसान झाले असून यामुळे या राज्यांमधील साखरेचे उत्पादन कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील गळीत हंगामात केवळ 62 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. कर्नाटकमध्ये केवळ 33 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे._x000D_ चालू गाळप हंगामात तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमधील साखर उत्पादन 52 लाख टन होण्याचा अंदाज आहे, जे प्राथमिक अंदाजाप्रमाणेच आहे._x000D_ संदर्भ - आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, 26 फेब्रुवारी 2020_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
24
0
संबंधित लेख