AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
उशिरा गाळप झाल्याने दोन महिन्यांत साखर उत्पादन 54% टक्क्यांनी कमी झाले
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
उशिरा गाळप झाल्याने दोन महिन्यांत साखर उत्पादन 54% टक्क्यांनी कमी झाले
चालू गाळप हंगामातील पहिल्या दोन महिन्यांत साखर उत्पादन ऑक्टोंबर २०१९ पासून सुरू झाले होते, महाराष्ट्रात होणाऱ्या उशीरा गाळप झाल्यामुळे 54% घटून ते १८.८५ लाख टनांपर्यंत खाली आले आहे. गेल्या वर्षी याच काळात 40.69 लाख टन साखर उत्पादन झाले होते. भारतीय साखर कारखाने असोसिएशनच्या (आयएसएमए) मते सध्याच्या गाळप हंगामात साखर उत्पादन केवळ 260 लाख टन एवढे होईल, तर अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे अंदाज 273 लाख टन होईल एवढा अनुमान दिला आहे. महाराष्ट्रातील केवळ 43 साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले आहे. गत गाळप हंगामातील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 18.89 लाख टन तुलनेत राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत केवळ 67,000 टन साखर उत्पादन झाले आहे.
तथापि, उत्तर प्रदेशात या दोन महिन्यांत साखरेचे उत्पादन किंचित वाढून १०.8१ लाख टन झाले आहे, तर मागील गाळप हंगामात राज्यात केवळ 9.14 लाख टन साखर उत्पादन झाले होते. कर्नाटकातील 61 साखर कारखान्यांनी 5.21 लाख टन साखर उत्पादन केले आहे. गुजरातमधील 14 साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरू झाले असून आतापर्यंत 75 हजार टन साखर उत्पादन झाले आहे. संदर्भ -आउटलुक अॅग्रीकल्चर, 3 डिसेंबर2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
80
0