क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
स्टार्च कारखाने यूक्रेनवरून मक्का करतात आयात
नवी दिल्ली- स्टार्च कारखाने यूक्रेन या देशाकडून अॅडव्हान्स परवान्या अंतर्गत नॉन जीएम मका आयात करत आहे. केंद्र सरकारने एप्रिल २०१९ मध्ये १५ टक्के आयात शुल्क दराने एक लाख टन नॉन जीएम मक्का आयात करण्याची परवानगी दिली आहे. यूएस ग्रेन कौन्सिलचे भारतीय प्रतिनिधी अमित सचदेव यांनी सांगितले की, यूक्रेनकडून २०५ डॉलर प्रति टन दराने अॅडव्हान्स परवान्या अंतर्गत मक्का आयात होत आहे. या अंतर्गत आयात करणाऱ्या व्यापारांना पुढे याची निर्यात करणे आवश्यक आहे. अद्याप जवळजवळ ८० हजार टनपेक्षा जास्त मक्क्याची आयात झाली आहे. मक्क्याची आयात बंदरगहाच्या भोवताली स्टार्च कारखाने करत आहेत.
आयातित मकाचे भाव भारतीय बदंरगाहवर पोहचवून २०५ डॉलर प्रति टन आहे, यामध्ये परिवहन अंतर्गत किंवा अन्य खर्च मिळून बंदरगाहच्या जवळ स्थित स्टार्च कारखान्यांमध्ये पोहचवून मक्क्याचे भाव १, ७५० ते १,८०० रूपये प्रति क्विटल आहे. कृषी मंत्रालयचे दुसरे आरंभिक अंदाजानुसार २०१८ -१९ मध्ये रबी हंगामात मक्काचे उत्पादन ७५.८ लाख टन होण्याचा अंदाज आहे, मागील वर्षी रबीमध्ये ७६.३ लाख टनचे उत्पादन झाले आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १० मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
21
0
संबंधित लेख