AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
किडींचे जीवनचक्रअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कोळी किडीचे जीवनचक्र
आर्थिक महत्व:- _x000D_ कोळी सर्व भाज्या, फळझाडे आणि धान्य तसेच तेलबिया पिकाचे नुकसान करते. कोळीच्या काही प्रजाती रोगाचे वाहन करण्याचीदेखील कार्य करतात आणि विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात._x000D_ _x000D_ जीवनचक्र:- _x000D_ _x000D_ अंडी:- मादी पानांच्या मागील पृष्ठभागावर जवळजवळ ३५-७० (पांढरा रंग) अंडी देतात. अंडी कालावधी सुमारे ३-४ दिवसांचा असतो._x000D_ _x000D_ पिल्ले अवस्था:- पिल्लांची अवस्था दोन टप्प्यात असते. पहिली "प्रोटोनोम्फ" च्या रूपात आणि दुसरी "ड्यूटमनिफ". पिल्लांचा रंग गर्द लाल किंवा पिवळा असतो. या अवस्थेचा साधारणतः ३ आठवड्यांचा कालावधी असतो. _x000D_ _x000D_ पतंग (प्रौढ):- प्रौढ मुख्यतः लाल रंगाचा असतो. या अवस्थेचा कालावधी १२-३३ दिवसांचा असून हे पिकांचे नुकसान करतात. अंडी पासून प्रौढ अवस्थेपर्यंतचा जीवन चक्र कालावधी पहिला तर सुमारे ३ ते ६ आठवड्यांचा असतो._x000D_ _x000D_ नियंत्रण:- फेनप्रोक्झिमेट ५ एसपी @१० मिली किंवा फेनाक्झाक्वीन १० ईसी @१० मिली किंवा सल्फर ८० डब्ल्यूपी @१० ग्रॅमप्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी._x000D_ _x000D_ संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
90
0