AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
धान्य पिकाच्या बियाणांना जैविक बीजप्रक्रिया
जैविक शेतीKVK Mokokchung, Nagaland
धान्य पिकाच्या बियाणांना जैविक बीजप्रक्रिया
जैव-खते ही सूक्ष्मजीवांचा प्रभावी वाहक आहे. ज्यामध्ये उपयुक्त जिवाणू, बुरशी, एकपेशीय वनस्पती यांचे एकत्रीकरण असून ते जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या क्रियेला चालना देऊन पिकास अन्नद्रव्ये पुरवठा करण्यास मदत करतात.
जैविक खते- अझोटोबॅक्टर, अॅझोस्पिरिलम, फॉस्फोटिका तृणधान्य: मुख्य धान्य पिके- भात, गहू, मका उपमुख्य धान्य पिके- बार्ली, ओट्स , ज्वारी, बाजरी इ. वापरण्याची पद्धत: बीजप्रक्रिया:- अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरिलम @२०० ग्रॅम + फॉस्फोटिका २०० ग्रॅम ही जीवाणूजन्य पावडर ३००-४०० मिली पाण्यात टाकून चांगले मिसळवी. हे द्रावण एकजीव करावे, त्यानंतर हे द्रावण १०-१२ किलो बियाण्यास अलगद हाताने चोळून घ्यावे. ही प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरणीसाठी वापरावे. रोपांच्या मुळांवर प्रक्रिया: अॅझोटोबॅक्टर @१ किलो आणि १ किलो फॉस्फोटिकामध्ये पुरेसे पाणी मिसळा आणि या एकजीव करा. एक एकर क्षेत्रासाठी पुर्नलागवडीच्या रोपांची मुळे या द्रावणामध्ये बुडवून घ्यावे आणि साधारणतः ३० मिनिटे किंवा त्यापेक्षा जास्त काळ ठेवून ताबडतोब पुर्नलागवड करावी. भात (कमी क्षेत्र) असल्यास शेतात एक लहान बेड तयार करा आणि त्यामध्ये ३-४ इंच पाणी भरा. या पाण्यात २ किलो अॅझोस्पिरिलम + २ किलो फॉस्फोटिका मिसळावे. त्यानंतर एकराची रोपे ८ - १२ तास (रात्रभर) बुडवून त्यांची पुर्नलागवड करावी. फायदे:- • पिकाच्या उत्पादनात २०-३०% वाढ होते. • २५% रासायनिक खतांची बचत होते. • नैसर्गिक मातीची सुपीकता वाढते. • अत्यंत कमी खर्चात पिकांना पोषक द्रव्ये उपलब्ध होते. • मातीची सुपीकता आणि पिकांच्या वाढीवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही. • त्वरीत बियाणे उगवण, फुलधारणा आणि पिकामध्ये परिपक्वता येते. • सेंद्रीय पदार्थांचे विघटन करण्यास मदत करते. • प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणास अनुकूल. खबरदारी:- • जैविक खते थंड व कोरड्या जागी ठेवा. • वापरण्यापूर्वीच पॅकेट्स उघडा आणि ते वेळेत वापरा. • जैव खतांचा उपचार केलेल्या बियाणांमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके आणि कीटकनाशकांमध्ये मिसळू नये. • जर बियाण्यावर बुरशीनाशकाचा उपचार करायचा असेल, तर प्रथम बीजप्रक्रिया केल्यानंतर जैविक-खतांच्या दुप्पट प्रमाणात डोस द्यावा. • कंपोस्टबरोबर जैव खतांची बीजप्रक्रिया व त्यांचे मिश्रण सावलीत ठेवावे. • रासायनिक खते व सेंद्रिय खतांसह जैव खताच्या वापरावर भर देण्यात येत आहे. जैव-खते ही रासायनिक खतांची बचत करत नाहीत, तर त्यांची आवश्यकता देखील भागवेतात. संदर्भ :- के.व्ही.के मोकोकचुंग, नागालँड जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
99
1
इतर लेख