AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
SBI कडून आपल्या ग्राहकांना 2 लाखांचा विमा मोफत!
समाचारTV9 Marathi
SBI कडून आपल्या ग्राहकांना 2 लाखांचा विमा मोफत!
➡️भारतीय स्टेट बँकेमध्ये जन धन खाते असलेल्या ग्राहकांना २ लाख रुपयांचा विनामूल्य जीवन विमा मिळत आहे. एसबीआय जनधन खाते उघडल्यावर रुपे डेबिट कार्डाद्वारे आपल्या ग्राहकांना २ लाख रुपयांचा जीवन विमा देत आहे. ➡️ज्यांनी २८ ऑगस्ट २०१८ पूर्वी SBI मध्ये जन धन खाते उघडले, त्यांच्यासाठी जीवन विम्याची रक्कम १ लाख रुपये निश्चित आहे. ज्या ग्राहकांनी या तारखेनंतर जन धन खाते उघडले, त्यांना SBI द्वारे २ लाख रुपयांचा विमा दिला जात आहे. दोन्ही खातेधारकांसाठी हा विमा पूर्णपणे मोफत आहे. विम्याचा दावा कसा करावा? ➡️२ लाखांच्या मोफत जीवन विम्याचा दावा करण्यासाठी काही नियम आहेत. जर खातेदाराला काही अप्रिय घडले आणि ते जग सोडून गेले, तर त्या दिवसाच्या ९० दिवस आधी, रुपे डेबिट कार्डद्वारे एक किंवा दुसरा व्यवहार यशस्वी झाला पाहिजे. हा व्यवहार स्वतःच्या बँकेत किंवा इतर कोणत्याही बँकेमध्ये करण्याचा नियम आहे. बँकेत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर जीवन विम्याचे २ लाख रुपये नामनिर्देशित व्यक्तीला दिले जातात. जन धन खाते उघडण्यासाठी कागदपत्रे 💠 जन धन खाते उघडण्यासाठी KYC ची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलीय. तुम्ही खाली नमूद केलेली कोणतीही कागदपत्रे सादर केल्यानंतर SBI किंवा इतर कोणत्याही बँकेत जन धन खाते उघडू शकता. 💠 पासपोर्ट 💠 चालक परवाना 💠 पॅन कार्ड 💠 आधार कार्ड 💠 मतदार ओळखपत्र 💠 राज्य सरकारच्या शिक्कासह नरेगाद्वारे जारी केलेले जॉब कार्ड 💠 केंद्र किंवा राज्य सरकार, घटनात्मक किंवा नियामक प्राधिकरण, सरकारी कंपनी, व्यावसायिक बँक, सरकारी वित्तीय संस्था यांनी जारी केलेले ओळखपत्र 💠 साक्षांकित छायाचित्र असलेले पत्र राजपत्रित अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेले 💠 यापैकी कोणतीही कागदपत्रे नसली तरीही एक लहान खाते उघडता येते. स्वत: ची स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा असलेले स्वत: चे साक्षांकित छायाचित्र असलेले पत्र. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
25
6
इतर लेख