AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
SBI शेतकर्‍यांना अ‍ॅग्री गोल्ड कर्ज कमी व्याजदराने देणार, कर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
कृषि वार्ताकृषी पिटारा
SBI शेतकर्‍यांना अ‍ॅग्री गोल्ड कर्ज कमी व्याजदराने देणार, कर्जाची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
➡️देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. स्टेट बँक कमी व्याजदरात शेतकऱ्यांना अर्थ साहाय्य करत आहे. स्टेट बँकेच्या १० हजार ५०५ शहरी आणि ग्रामिण शाखा आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा नेहमी पुर्ण करत असतात. ➡️स्टेट बँक शेतकऱ्यांसाठी अ‍ॅग्री गोल्ड कर्ज ही योजना सुरू केली आहे. आतापर्यंत ५ लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. ➡️जर आपल्याही कर्ज घ्यायचे असेल तर आपण आपल्या शेतीचे कागदपत्र बँकेला दाखावे लागतील. कागदपत्र दाखवल्यानंतर बँक आपल्याला कर्ज देईल. विशेष म्हणजे या एग्री गोल्ड लोन साठी बँकेने अत्यंत कमी व्याजदर आकारले आहे. ➡️एसबीआयच्या या योजनेंतर्गत शेतकऱ्याला सोन्याचे दागिने बँकेत जमा करावे लागतील. त्यानंतर शेतकरी आपल्या अपेक्षेप्रमाणे कर्ज घेऊ शकतो. पण यात एक अट आहे, ती म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे. कारण जमिनीचे कागदपत्र बँकेत जमा करावी लागतात. ➡️यात दोन प्रकारची कर्ज आहेत एग्री गोल्ड लोन हे पीक उत्पन्न आणि मल्टी पर्पस गोल्ड कर्ज आहे. अ‍ॅग्री गोल्ड कर्ज हे पीक उत्पन्नासाठी असून याची मर्यादा ही ३ लाख ते त्यापेक्षा अधिकची आहे. तीन लाखाच्या कर्जावर ७ टक्के व्याजदर तर त्यापेक्षा अधिकच्या कर्जासाठी ९.९५ टक्के व्याजदर आहे. मल्टी पर्पज गोल्ड कर्जासाठी ९.९५ टक्के व्याजदर आहे. अ‍ॅग्री गोल्ड कर्ज SBI चे वैशिष्टये १) सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले जाऊ शकते. २)कर्जाची प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे. ३)कमी व्याज दर. ४)कोणतेही छुपे शुल्क नाही ५)परतफेडचे वेळापत्रक लवचिक आहे. अ‍ॅग्री गोल्ड कर्ज SBIसाठी आवश्यक कागदपत्रे १)शेतकऱ्यांचे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो. २)ओळखपत्र- आधार कार्ड, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना. ३)राहण्याचा पत्ता ४)मतदान कार्ड ५)जमिनीचा उतारा सात बारा उतारा ६)कर्ज घेण्यासाठी काय कराल जर आपल्याला अ‍ॅग्री गोल्ड कर्ज घ्यायचे असेल तर आपण थेट बँकेत जाऊ शकतात. किंवा योनो अॅप द्वारे तुम्ही अर्ज करु शकता. याशिवाय तुम्ही ऑनलाईनही कर्जासाठी अर्ज करु शकता. https://sbi.co.in https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/gold-loan संदर्भ - कृषी पिटारा, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
92
14
इतर लेख