AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
SBI बँक शेतकर्‍यांसाठी हि नवीन कर्ज योजना सुरू करणार!
कृषी वार्तान्यूज18
SBI बँक शेतकर्‍यांसाठी हि नवीन कर्ज योजना सुरू करणार!
SBI बँक फक्त पीक कर्जच देत नाही तर आम्ही सेफ अँड फास्ट एग्रीकल्चर लोन (सेफल) नावाचे उत्पादन बाजारात आणणार आहोत. सेफल अशी एक कंपनी आहे ज्याने सर्व सेंद्रिय कापूस उत्पादकांना एकत्र आणले. आणि ब्लॉकचेनच्या आधारे डेटाबेस तयार केला आहे. याचा भविष्यात भरपूर फायदा होण्यास मदत मिळणार. जगभरात कापसाचा कोणताही खरेदीदार खरोखरच सेंद्रिय कापूस विकत घेत आहे की नाही हे आम्ही या योजनेतून तपासू शकतो. आम्ही यासंदर्भात संपूर्ण डेटा घेत आहोत आणि त्यांना क्रेडिट लिंक प्रदान करीत आहोत . जे शेतकरी सेंद्रिय कापूस पिकवण्यास इच्छुक आहेत त्यांना साहाय्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे . या योजनेद्वारे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही त्यांना एकत्र आणले आहे आणि त्यांना बाजारपेठेची दृश्यता उपलब्ध करून दिली आहे, असेही ते म्हणाले. एआय आणि एमएलच्या वापराचे आणखी एक उदाहरण देताना सेट्टी म्हणाले की, लॉकडाऊन दरम्यान बँकेने १. ७ दशलक्ष पूर्व मंजूर कर्जे केली आहेत आणि २१ हजार कोटी व्यवसाय या उत्पादनाखाली नोंदविले गेले आहेत. बँकेकडून डेटा टेकनॉलॉजिचा पूर्ण निरीक्षण करून ते म्हणाले, आमचा एआय / एमएल विभाग हा एक प्रयोगशील विभाग नाही, तर तो व्यवसायभिमुख विभाग आहे. आमच्याकडे निव्वळ उत्पन्न निर्मिती ११०० कोटी इतकी आहे. सध्या बँकेकडे ४० हून अधिक मशीन लर्निंग आधारित मॉडेल आहेत जे व्यवसायात जोखीम कमी करणे, फसवणूक व्यवस्थापनासाठी आळा घालणे यास मदत करतील. संदर्भ - ८ सप्टेंबर २०२० न्युज १८, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
145
26
इतर लेख