कृषी वार्तान्यूज १८ लोकमत,
SBI च्या 44 कोटी ग्राहकांसाठी 2 दिवसात होणार मोठा बदल!
➡️ स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील दोन दिवसात महत्त्वाच्या नियमात बदल होणार आहेत. एटीएममधून पैसे काढण्यापासून ते चेकबुकपर्यंत काही नियमांत बदल होणार आहेत. हे नियम 1 जुलैपासून लागू होत आहेत. ग्राहकांना काही अधिकचं शुल्क एक तारखेपासून द्यावं लागेल. बदलणारे नियम बेसिक सेव्हिंग अकाउंट डिपॉझिट अकाउंट होल्डर्ससाठी लागू होणार आहेत.
एसबीआय बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट काय आहे?
➡️ एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट गरीब घटकांना कोणत्याही शुल्काशिवाय खाती उघडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहे. त्याला झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट असंही म्हणतात. यामध्ये कमीतकमी किंवा जास्तीत जास्त बॅलन्सची आवश्यकता नसते. या खातेदारांना एटीएम-कम-डेबिट कार्ड मिळतं. केवायसीची वैध कागदपत्रे असलेली कोणतीही व्यक्ती एसबीआयकडे बीएसबीडी खातं उघडू शकते.
➡️ बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खातेधारकांना दरमहा चार वेळा मोफत पैसे काढता येतात, ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. पैसे काढण्यावर शुल्क होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर लागू होईल.
चेकबुक शुल्क
-SBI बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल
-25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल.
-इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल.
-ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली जाईल
एटीएममधून पैसे काढण्याचे नियम
SBI ATM किंवा बँकेतून पैसे काढणं चार वेळा मोफत आहे. यानंतर पैसे काढण्यासाठी 15 रुपये आणि जीएसटी शुल्क लागू करण्यात येतं. एसबीआयने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने अलीकडेच धनादेश वापरुन रोख पैसे काढण्याची मर्यादा वाढवून दररोज एक लाख रुपये केली आहे.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- न्यूज १८ लोकमत,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.