AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
SBI ची धमाकेदार ऑफर, मोफत मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा!
कृषी वार्ताTV9 Marathi
SBI ची धमाकेदार ऑफर, मोफत मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा!
👉एसबीआय मधील गृहकर्ज वार्षिक वर्षाकाठी ६.८०% पासून सुरू होते. इतर बँकांच्या तुलनेत एसबीआयचा व्याज दर खूपच कमी असून ग्राहकांना सहज कर्ज मिळते. 👉 भारतीय स्टेट बँकेने (SBI) ३१ मार्च २०२१ पर्यंत गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केलं आहे. देशातील या सर्वात मोठ्या सरकारी बँकेने गृह कर्जावरील सर्वात कमी व्याज दर घेण्याची घोषणा केली आहे. एसबीआय मधील गृहकर्ज वार्षिक वर्षाकाठी ६.८०% पासून सुरू होते. इतर बँकांच्या तुलनेत एसबीआयचा व्याज दर खूपच कमी असून ग्राहकांना सहज कर्ज मिळते. 👉इतकंच नाहीतर एसबीआय अनेक श्रेणींमध्ये त्यांच्या ग्राहकांना गृह कर्ज देत आहे. यासाठी नियमित गृह कर्ज योजना, सरकारी कर्मचार्‍यांसाठी एसबीआय विशेषाधिकार गृह कर्ज, सैन्य दलातील जवानांसाठी एसबीआय शौर्य गृह कर्ज, एसबीआय मॅक्सगेन होम लोन, एसबीआय स्मार्ट होम, टॉप-अप कर्ज, एसबीआय एनआरआय होम लोन, मोठ्या प्रमाणात कर्जाच्या खास सुविधा देण्यात येत आहे. 👉एसबीआय फ्लेक्सीपे होम लोकांसाठी कर्ज आणि महिलांसाठी एसबीआय हरघर होम लोन इत्यादी कर्ज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर यासाठी मोबाईल नंबर ७२०८९३३१४० देण्यात आला आहे. ज्यावर तुम्ही मिस्ड कॉल देऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता. मालमत्ता दर घसरले 👉कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर बाजार हळू हळू उघडत आहेत आणि अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. अशात मालमत्तेमध्ये अनेक वर्षांपासून मंदी सुरू आहे. अधिकचा खर्च लक्षात घेता, लोक घर खरेदीसाठी कमी पैसे टाकत आहेत. परंतु एसबीआयने ज्या पद्धतीने प्रक्रिया शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे, यामुळे खरेदीदारांचा उत्साह वाढेल आणि त्यांना मालमत्तेत गुंतवणूक करायची इच्छा निर्माण होईल. संदर्भ - TV9 मराठी, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
36
12
इतर लेख