कृषी वार्तामराठी एबीपी लाईव्ह
SBI ग्राहकांनो आता घरबसल्या मागवा पैसे घरी!
➡️ कोरोना काळात आपल्या ग्राहकांसाठी बँकानी अनेक नियम लागू केले. ग्राहकांनी जास्तीत जास्त नेटबँकिंग सुविधेचा वापर करावा याकडे बँकांचा जास्त कल होता. जेणेकरुन बँकेत, एटीएममध्ये गर्दी होणार नाही आणि कोरोनापासून संरक्षण होईल. मात्र तरीही रोख रकमेची गरज असल्यास नागरिकांना एटीएममध्ये किंवा बँकेत जावच लागतं. मात्र SBI अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया एक पाऊल पुढे जात ग्राहकांसाठी SBI डोअर स्टेप सेवा देत आहे. ज्यामध्ये एसबीआयचे ग्राहक घरबसल्या पैसे घरी मागवू शकतात. ➡️ SBI कॅश डिलिव्हरी सोबत डोअर स्टेस सर्व्हिसमध्ये चेक घेणे आणि देणे, 15H फॉर्म यासारख्या सेवा देत आहे. म्हणजेच या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्हाला या सर्व सुविधा एकाच रिक्वेस्टसह घरी बसून मिळतील. मात्र बँक केवळ काही शाखांमध्ये रोख रक्कम देण्याची सुविधा देत आहे. कॅश डिलिव्हरी सेवेचा घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? ➡️ SBI चे ग्राहक घरबसल्या केवळ 20 हजार रुपयांपर्यंत पैसे काढू किंवा जमा करु शकतात. ही सर्व्हिस रिक्वेस्ट केवळ सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत स्वीकारली जाईल आणि बँका खुल्या असतील त्याच दिवशी सुरु राहील. आपलं खातं ज्या शाखेत आहे त्याच शाखेत या सुविधेचा ग्राहक फायदा घेऊ शकतील. डोअर स्टेप सेवा विनामूल्य नाही. यासाठी ग्राहकांना 100 + जीएसटी द्यावा लागेल. ग्राहक 1800-111-103 वर कॉल करून कॅश ऑर्डर करु शकतात. ग्राहकांचे घर होम ब्रांचच्या 5 किमीच्या अंतराच्या आत असले पाहिजे. चेकबुक आणि पासबुकद्वारे पैसे काढता येतील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- मराठी एबीपी लाईव्ह, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
2
इतर लेख