AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
बनावट बियाण्यांच्या विक्रीवर डिसेंबरपासून बंदी!
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
बनावट बियाण्यांच्या विक्रीवर डिसेंबरपासून बंदी!
नवी दिल्ली, प्रमाणित बियाण्यांच्या विक्रीसाठी डिसेंबर २०१९ पासून पॅकेट / पोत्यावर '2 डी बार कोड' ठेवणे बंधनकारक असेल. बनावट बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे उद्दिष्ट आहे. कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, बियाणे उत्पादक कंपन्यांना २ डी बार कोडमध्ये पॅकेट / पोत्यातील बियाण्याशी संबंधित संपूर्ण माहिती द्यावी लागेल. तसेच, ही माहिती डिजिटलद्वारे प्रदान करण्यासाठी २ डी बार कोड केंद्रीय पोर्टलला जोडला जाईल. २ डी बार कोडमध्ये, उत्पादक कंपनीला उत्पादकांचे संपूर्ण उत्पादन तपशील, उत्पादनाचे ठिकाण कोड, प्रक्रिया संयंत्र कोड देणे आवश्यक आहे. जीएम/बीटी कापूस इत्यादी बाबतीत बियाणे उपचार व इतर माहिती पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार देणे बंधनकारक असेल. त्यांनी सांगितले की, बियाणे कायद्यांतर्गत अधिसूचित केलेले वाण केवळ प्रमाणपत्रास पात्र आहेत. बियाणे प्रमाणपत्र संस्था देशातील २५ राज्यात कार्यरत आहेत. ज्या राज्यांमध्ये प्रमाणन संस्था नाहीत त्यांच्याकडे स्वतंत्र बियाणे प्रमाणपत्र संस्था तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. केंद्रीय सहाय्य देऊन बियाणे प्रमाणन एजन्सींना बळकट करणे आवश्यक आहे आणि हे बियाणे वापरण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल. संदर्भ:- आउटलुक अॅग्रीकल्चर, ११-११-२०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
112
0