क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि वार्ताकृषी जागरण
लष्करी अळीविरूद्ध लढणार प्रकल्प ‘सफल’
‘सफल’ या प्रकल्पाद्वारे नवनवीन तंत्रे, उत्तम कृषी पद्धती व विविध उपायांच्या माध्यमातून लष्करी अळीमुळे होणारी हानी कमी होणार आहे.
देशात लष्करी अळीपासून शेतीची सुरक्षा व्हावी यासाठी 'सफल' प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा प्रकल्प दक्षिण आशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर (एसएबीसी) या कृषी वैज्ञानिक संस्थेने सुरू केला आहे. या प्रकल्पाचे ध्येय नवनवीन तंत्र, उत्तम कृषी पद्धती व विविध उपाय विकसित करून लष्करी अळी नष्ट करणे हे आहे. ऑगस्ट २०१८ मध्ये कर्नाटक येथे मक्का या पिकामध्ये लष्करी अळी आढळली होती. विशेषत: या अळीमुळे मका या पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. ही अळी पिकांच्या सुरूवातीच्या टप्प्यात पिकांवर हल्ला करते. ही अळी स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न, मक्का, ऊस व ज्वारीसोबतच महत्वाच्या अन्न पिकांवरदेखील परिणाम करतात. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यात ही अळी सापडली असल्याचे सांगितले आहे. एसएबीसी के अध्यक्ष डॉ. सीडी माई यांनी सांगितले की, लघु उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कापसामध्ये असणाऱ्या गुलाबी बोंड अळीला नष्ट करण्याचा शोध लावला गेला आहे. त्याचबरोबर लष्करी अळीला आळा घालण्यासाठीदेखील उपाय शोधले जाईल. काही दिवसांपूर्वीच, एसबीसीने महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील गुलाबी बोंड अळीला नष्ट करण्याचे यशस्वीरित्या अभियान राबविले आहे. संदर्भ – कृषी जागरण, ८ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
68
0
संबंधित लेख