AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कापसाचे आयात दुप्पट होण्याचे अनुमान
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कापसाचे आयात दुप्पट होण्याचे अनुमान
घरगुती बाजारपेठेत कपासच्या किंमतीमध्ये वेगाने वाढ झाल्याने, चालू हंगाममध्ये कापसाच्या आयातीमध्ये वाढ होऊन ३१-३२ लाख गाठीते (एक गाठ-१७० किलो) पेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय) चे अध्यक्ष राकेश राठी यांनी सांगितले की, उत्पादक राज्यांमध्ये कपासाचा पुरवठा कमी असल्याने, उत्पादक बाजरपेठेत दैनिक आवक सीमित प्रमाणात होत आहे. आठवडयाभरात कापसाच्या किंमतीमध्ये जवळपास २,००० रू. प्रति कैंडीची वाढ होऊन भाव ४६,००० ते ४६,५०० रू. प्रति कैंडी झाली आहे. जे की मागील वर्षी, या आठवडयात भाव ४४,००० ते ४४,५०० रू. प्रति कैंडी.
सीएआयच्या चालू हंगामात अद्याप जवळजवळ २५ लाख गाठीचे आयातीचे सौदेदेखील झाले आहेत. कापसाच्या निर्यातीमध्ये घट होऊन, चालू हंगाममध्ये ४२ ते ४३ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी पिकांच्या हंगामात ६९ लाख गाठी निर्यात झाल्या आहेत. चालू पीक हंगाम २०१८-२०१९ मध्ये कापसाचे उत्पादन घट होऊन ३१५ लाख गाठी (एक गाठी -१७०किलो) होण्याचा अंदाज आहे. जे की मागील वर्षी, ३६५ लाख गाठीचे उत्पादन झाले होते.. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २८ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
68
0