क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कुपनलिकेद्वारा भूजल पुनर्भरण
पावसाचे पाणी कुपनलिकेत सोडणे म्हणजे कुपनलिका पुनर्भरण होय. कुपनलिकेच्या जवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे. कुपनलिकेच्या सभोवताली २ मी लांब *२ मी रुंद * २ मी खोल आकाराचा खड्डा खोदावा खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाईप च्या भागात २ ते २.५ सेंमी अंतरावर सर्व बाजूनी ४ ते ५ मि.मी व्यासाची छिद्रे पाडावीत.या छिद्रावर काथ्या घट्ट गुंडाळावा. सर्वात खड्ड्याच्या सर्वात खालच्या भागात दगड विटांचे तुकडे त्याच्या वरच्या भागात खडी नंतरच्या वरच्या भागात जाड वाळू व सर्वात वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी.
पुनर्भरणच्या वेळी घ्यावयाची काळजी • ओढ्याला येणारे पाणी क्षार व रसायनविरहित असावे. • पुनर्भरण हे स्वच्छ पाण्याने करावे . • ज्या क्षेत्रावर क्षार जमा होत असतील तर ते त्या क्षेत्रावरीलपाणी पुनर्भरणास वापरू नये • औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरू नये. • सूक्ष्म जीवाणूजन्य तथा रोगराई स्थित क्षेत्रातील पाणी वापरू नये. अग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस १७ मे १८
179
0
संबंधित लेख