क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
मान्सून समाचारपुढारी
दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
पुणे: दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी बुधवारी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्हयांमध्ये पावसाचा जोर अधिक असेल. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हयांना पावसाचा फटका बसेल, असे ही सांगण्यात आले आहे. पुढील ३-४ दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढणार आहे. परिणामी पुढील २ ते ३ दिवस कोकणात पावसाच्या काही जोरदार सरी कोसळतील. त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडयात शनिवारपासून धो-धो पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. संदर्भ – पुढारी, २४ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
87
0
संबंधित लेख