मान्सून समाचारअॅग्रोवन
१९ जुलैपासून पुन्हा पावसाचा जोर
पुणे: मान्सून सातत्याने नसल्याने राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघदीप दिली आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर पडणाऱ्या पाऊसाचा जोर ओसरल्याने,नदयांचा पूर आटला आहे. मध्य महाराष्ट्रातही पाऊस थांबला असून, मराठवाडा, विदर्भात पावसाची ओढ कायम आहे. १८ जुलैपर्यंत पावसाची उघडीप कायम राहणार आहे. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. हे क्षेत्र पोषक ठरल्याने १९ जुलैपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धऱण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संदर्भ: अॅग्रोवन, १५ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
674
0
संबंधित लेख