AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
२२ जून पासून पुढे पावसाची शक्यता राहिल
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
२२ जून पासून पुढे पावसाची शक्यता राहिल
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर १००२ हेप्टापास्कल तर दक्षिण सीमेवर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाना भागावर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे मान्सून वारे दक्षिणे कडून पश्चिम भारताच्या उत्तरेकडील भागाकडेही मान्सूनची वेगाने वाटचाल अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे हिंदी महासागराच्या विषववृतीय भागावर १००२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे मान्सून पावसाला दि २२ जून नंतर जोर वाढेल. सद्याही हिंदी महासागरात मोठ्या प्रमाणावर ढग जमलेले असून हवेचे दाब अनुकूल असल्याने सद्याच्या काळात कोकणात पाऊस सुरु असून दि १९ रोजी पुणे जिल्हाच्या उत्तरेकडील भागात अल्पशा पावसाची शक्यता आहे.
तसेच दि २२ जून रोजी उत्तर महाराष्ट्र व उत्तरेकडील विदर्भातील भागात पावसाला वातावरण अनुकूल बनेल व पाऊस होईल तसेच दिनांक २३ जून मराठवाडा व मध्यमहाराष्ट्रातही पावसाची शक्यता निर्माण होऊन पाऊस होईल. तसेच २५ व २६ जून या दिवशी पावसाची शक्यता असून तेथून पुढे महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तोपर्यंत कोकणातील सर्वच जिल्ह्यात ४० मिलीमीटर ते ६० मिलीमीटर प्रती दिन पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल आणि तो काही जिल्ह्यात ताशी २० किमी राहील. डॉ .रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ)
638
0
इतर लेख