पशुपालनwww.vetextension.com
दुधाळ जनावरांचे बाहय परजीवीपासून संरक्षण
बाहय परजीवी जनावरांच्या केस व त्वचेवर असतात. हे परजीवी जनावरांना हानी पोहचवतात. परजीवी स्वत:चे पोषण करून घेण्यासाठी जनावरांच्या त्वचेला चिकटून राहतात.
बाहय परजीवीपासून होणारे नुकसान –
या बाहय परजीवीच्या प्रसारामुळे त्वचा कोरडे पडते. त्वचेवरचे केस गळून जात असल्यामुळे जनावरांमध्ये रक्ताची कमी येऊन, जनावरे खाणे पिणे सोडते त्याचा परिणाम दुध उत्पादनावर होतो त्यामुळे उत्पादनात घट होते.
उपाय –
बाहय परजीवीचे प्रमाण व गंभीरता ओळखून पशु वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्याने औषधोपचार करावे.
उपचारा वेळी घ्यायची काळजी –
• जनावरांना औषध लावण्याच्या आधी त्यांना पाणी पाजून घ्यावे.
• गोठ्यातील सर्व जनावरांना एकाच वेळी औषध लावून घ्यावे.
• जनावरांच्या गोठ्यात परजीवीच्या नियंत्रणासाठी औषधाची फवारणी करून घ्यावी.
संदर्भ : www.vetextension.com
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!