AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तांबेरा रोगापासून करा अंजिराचे संरक्षण
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
तांबेरा रोगापासून करा अंजिराचे संरक्षण
तांबेरा रोगापासून करा अंजिराचे संरक्षण कमी तापमान आणि जास्त आद्रतेच्या काळामध्ये अंजीर बागेमध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो.हा रोग सिरोटीलीय फिकी या बुरशीमुळे होतो.या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे फळांवर काळपट रंगाचे डाग पडतात.फळे चांगली पिकात नाही. लगेच खराब होतात.त्यामुळे या काळात या रोगाच्या नियंत्रणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. लक्षणे – फळांवर काळपट डाग असंख्य डाग पडतात. अशी फळे चांगली पिकत नाही.कडक होतात व पिकल्यानंतर ताबडतोब खराब होतात. रोगाचे प्रमाण जास्त राहिल्यास झाडाची पाने पिवळी पडून गळतात अतिरोगग्रस्त बागेत तर केवळ फळे व फांद्या शिल्लक राहतात. परिणामी अशा बागेत फळांची वाढ खुंटते उघड्या पडलेल्या फळांवर सूर्याच्या उष्णतेमुळे चट्टे पडतात.
नियंत्रण १) बागेची छाटणी करावी त्यामुळे रोगग्रस्त फांद्याची संख्या कमी होते व जोमाने नवीन फुट होते. २) बागेमध्ये स्वच्छता ठेवावी.रोगट पाने ,फळे तसेच छाटलेल्या रोगात फांद्या गोळा करून ती बागेबाहेर जाळून टाकाव्यात. ३) कोवळी पाने फुटल्यावर साधारण छाटणीनंतर २० दिवसांनी क्लोरोथॅलोनील २० ग्राम + कार्बेन्डेझिम १० ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढील फवारण्या घ्याव्यात अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस १४ जून १८
121
10