AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
‘या’ पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
कृषि वार्ताAgrostar
‘या’ पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
आकडेवारीनुसार, देशात २०१८-१९ मध्ये कॉफीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळामुळे कॉफी व काळी मिरीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कर्नाटक राज्यातील कोडागू, हसन आणि चिकमंगलूर हे जिल्हे कॉफी व काळी मिरीचे मोठे उत्पादक आहेत. या तीन जिल्ह्यांमध्ये ७० टक्के कॉफीचे उत्पादन होते. कॉफ़ी बोर्डच्या अधिकाऱ्यांच्या मते, “कॉफीच्या रोपामध्ये ब्लॅक रॉट नावाचा एक रोगदेखील पसरला आहे. ज्यामुळे कॉफीचे बीन ही पडत आहेत. २०१७-१८ च्या तुलनेत कॉफीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.”
48
0
इतर लेख