AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खरीपाची पूर्व तयारी
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
खरीपाची पूर्व तयारी
१) खरिपाच्या पूर्व तयारीस लागावे – पूर्व मोसमी पावसाचे वातावरण आणि आगामी मान्सूनचे आगमन वेळेवर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खरीपाची पूर्व तयारीस लागणे अत्यंत गरजेचे आहे. या वर्षीचा मान्सूनवेळेवर येईल हि शक्यता लक्षात घेऊन जमिनीची नांगरट करून जमीन तापु द्यावी. शेणखत घालवायाचे झाल्यास शेणखत शेतात पसरून वापशावर कुळवाची पाळी द्यावी.आणि ते शेतात मिसळावे शेतातील पूर्वीच्या पिकाचे अवशेष गोळा करून जमीन स्वच्छ ठेवावी बीयाणे व खतांची जमवाजमव करून ठेवावी. २) खरीप हंगामाची पिक पद्धती जमीन व हवामान लक्षात घेऊन ठरवावी या वर्षी मान्सूनचा पाऊस सरासरी जेवढा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.तसेच जून महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता असल्याने सोयाबीन,मुग,मटकी,उडीद,चवळी या पिकांचा पेरा वेळेवर होणे गरजेचे होणे शक्य आहे. याशिवाय भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटीकेची तयारी सुरु करावी.
३) फळबागांचे लागवडीची तयारी करावी सीताफळ,पेरू,नारळ,आंबा,डाळिंब,केळी इत्यादींची रोपे लागवडीसाठी त्या आकाराचे खड्डे तयार करण्यास सुरवात करावी. प्रत्येक फळझाडांच्या आकारानुसार खड्ड्यांचा आकार लहान मोठा असतो तसेच खड्ड्यातील अंतर हि बदलते आपण लागवड करणार असलेल्या फळबागची लागवडीची माहिती असावयास हवी खड्डे भरण्यासाठी शेणखत व रासायनिक खतांची गरज असते. ४) पावसाळ्यापूर्वी जनावरांचा लसीकरण करावे जनावरांना लिव्हर फ्लू,घटसर्प,फऱ्या या रोगाबाबत लसीकरण केल्यास जनावरांना ते आजार होत नाहीत त्यसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सल्ला घ्यावा तसेच जंताचे औषध जनावरांना पाजावे जनावरांची काळजी घ्यावी.पावसाळ्यात गढूळ पाणी जनावरांना पाजू नये. डॉ. रामचंद्र साबळे जेष्ठ कृषी हवामान तज्ञ
221
0