AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अधिक उत्पादनासाठी जीवामृत तयार करा
जैविक शेतीअॅग्रोवन
अधिक उत्पादनासाठी जीवामृत तयार करा
जीवामृत हे किण्वन प्रक्रिया तयार करून, पिकांना मुलद्रव्य उपलब्ध करून देते तसेच पिकांचे बुरशी किडीपासून संरक्षण करत असते. जीवामृत तयार करण्याची पद्धत – १. बॅरलमध्ये २०० लिटर पाणी घेवून त्यामध्ये १० किलो गाईचे शेण मिसळून घ्यावे. यानंतर ५-६ लिटर गाईचे गोमुत्र, २ किलो गुळ, २ किलो डाळींचे पीठ व शेतीच्या बांधावरील मूठभर माती बॅरलमध्ये एकत्रित व्यवस्थित मिसळून घ्यावे. २. हे तयार केलेलं द्रावण सावलीत ठेवावे. कमीत कमी २ ते ३ दिवस सावलीत ठेवून सकाळ संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे. २०० लिटर जीवामृत हे एक एकर साठी पुरेसे होते.
जीवामृताचे फायदे –_x000D_ १. जीवामृत पिकांच्या वाढीचा जोम वाढवते व उत्पादनात वाढ करते._x000D_ २. पिकांमध्ये सहनशीलता वाढवते तसेच किडींना व रोगाला पिकांपासून दूर करते._x000D_ ३. मातीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवते व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविते._x000D_ ४. जीवामृताचा वापर सिंचनच्या माध्यमातून महिन्यातून २ वेळा करा. _x000D_ संदर्भ-http://www.fao.org_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
707
2