क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
परीक्षणासाठी पाण्याचा नमुना घेताना घ्यावयाची काळजी
पिकांच्या वाढीसाठी चांगल्या प्रतीच्या पाण्याची गरज असते. सिंचनाच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास पिकांची वाढ चांगली होत नाही.पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा सिंचनासाठी वापर करणे फायद्याचे ठरते. पाणी खारवट असल्यास व त्याचा सिंचनासाठी वापर केलेल्या शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास पिक उगवणीस अडथळा दिसून आल्यास पिक उगवणीस अडथळा दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास जमीन चिबड होऊन पाणी पृष्ठभागावर थांबत असल्यास आणि जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास सिंचनाच्या पाण्याची तपासणी करून घ्यावी. अशा परिस्थितीत क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास पिके पाणी आणि अन्नद्रव्याचे शोषण करू शकत नाही त्यामुळे पिकांवर दुष्परिणाम दिसून येतात.
परीक्षणासाठी पाण्याचा नमुना कसा घ्यावा - विहिरीच्या पाण्याचा नमुना घेताना विहारीतील पाणी चांगले ढवळून घ्यावे. विहिरवर पंप बसवलेला तर तो साधारणपणे १५ ते २० मिनटे सुरु ठेवून पाणी जाऊ द्यावे.प्लॅस्टिकची बाटली चांगली स्वच्छ धुवून घ्यावी. त्यामध्ये साधारणपणे १ लिटर पाणी भरावे. कुपनलिकेमधील पाण्याचा नमुनासुद्धा अशाच प्रकारे घ्यावा. तसेच त्या बाटलीवर शेतकऱ्याचे नाव व पत्ता शेताचा भूमापन क्रमांक, नमुना घेतल्याची तारीख व थोडक्यात पाण्याबाबत शेतकऱ्याचे अनुभव लिहिलेले लेबल बाटलीला चिकटवून प्रयोगशाळेत त्वरित पाठवावे. अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
110
0
संबंधित लेख