AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पाण्याची बचत करण्यासाठी उपाय योजना
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पाण्याची बचत करण्यासाठी उपाय योजना
१)जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मुलस्थानी जलसंधाराण पद्धतीचा अवलंब करावा. २)उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा. ३)जमिंनीची जलधारण क्षमता वाढवण्याठी सेंद्रिय खताचा वापर वाढवावा. ४)फळपिकांमध्ये प्लॅस्टिक किंवा शेतामधील पालापाचोळाचे अच्छादन करावे म्हणजे बाष्पीभवनचे प्रमाण कमी राहते व ओलावा टिकून राहण्यास मदत होते .
५)पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज बदलत असल्याने त्या त्या वेळच्या गरजेननुसार पाणी द्यावे ६)पाण्याची उपलब्धता कमी असल्यास सारी आड सारी पद्धतीने पाणी द्यावे म्हणजे पिकामध्ये ओलावा टिकून राहण्यास मदत होते. ७)कमी पाण्याच्या पिकाच्या लागवड पद्धती उदा.चारा पिकांसाठी हाड्रोपोनिक तंत्रज्ञान अवलंबावे . ८)फळ बागावर पाण्याचा ताण पडू नये म्हणून ८ टक्के केओलीन किंवा १ ते २ टक्के पोटॅशिअम नायट्रेट ची फवारणी करावी. ९)फळबागांचे उष्ण वाऱ्यापासून संरक्षण व्हावे म्हणून बागेच्या पश्चिम व दक्षिण बाजूस शेवरी व सुरु सारख्या झाडांची वारारोधक म्हणून लागवड करावी .
289
0
इतर लेख