क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
आंतरराष्ट्रीय कृषीयुनिव्हिजन मिडीया
पाॅलिहाऊसची शेती
पॉलिहाऊस शेती म्हणजे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली संरक्षित शेती. ज्यामध्ये वातावरणातील तापमान आर्द्रता नियंत्रित ठेवून इतर हंगामामध्येसुद्धा पिकांचे जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येते.
फायदे : १. पाॅलिहाऊसमध्ये नियंत्रित तापमानात जास्तीतजास्त उत्पादन घेता येते. २. कोणत्याही हंगामात पीक घेता येते. ३. फार कमी प्रमाणात पिकांवर प्रादुर्भाव होतो. ४. बाह्य वातावरणाचा पीक वाढीवर कोणताही परिणाम होत नाही. ५. पिकांचे गुणवत्ता व उत्पादन अधिक चांगले राहते. ६. पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो. हवा खेळती राहते. ७. कोणत्याही हंगामात पिकांना योग्य वातावरण मिळते. ८. ५ ते १० टक्के अधिक उत्पन्न मिळते. ९. पिके कमी कालावधीत जास्त परिपक्व होतात. १०. खतांचा वापर सोईस्कर पध्दतीने ठिबक सिंचनाद्वारे केला जातो . संदर्भ -युनिव्हिजन मिडीया जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
693
0
संबंधित लेख