AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
‘या’ योजनेने होणार कृषी क्षेत्राचा विकास
कृषी वार्ताAgrostar
‘या’ योजनेने होणार कृषी क्षेत्राचा विकास
केंद्र सरकारने शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने बर्‍याच सरकारी योजना राबविल्या, तसेच अनेक योजनांवर काम चालू आहे. पंतप्रधान किसान संपदा योजनेंतर्गत नुकतीच केंद्र सरकारने अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सुमारे 32 प्रकल्पांना मान्यता दिली आहे. हे प्रकल्प जवळपास 17 राज्यात पोहोचविणार असल्याची माहिती मिळाली आहे. या योजनेंतर्गत सुमारे 406 कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आली आहे._x000D_ _x000D_ या योजनेचा मुख्यत: हेतू खालीलप्रमाणे _x000D_ _x000D_ 1. पीएमकेएसवाय अंतर्गत 32 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. या नवीन प्रकल्पांमध्ये सुमारे 406 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हे प्रकल्प सुमारे 17 राज्यांपर्यंत पोहचविणार आहे. _x000D_ _x000D_ 2. या योजनेअंतर्गत सुमारे 15 हजार लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार दिले जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील._x000D_ _x000D_ 3. आधुनिक प्रक्रियेच्या तंत्रांनी शेती उत्पादनांचे नुकसान टाळता येईन, जेणेकरुन शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होऊ शकेल._x000D_ _x000D_ 4. भारतीय उत्पादकांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेतील ग्राहकांशी जोडले जाणार आहे ही शासनाची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे._x000D_ _x000D_ 5. अशा प्रकारे अन्न प्रक्रिया उद्योगाची अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होईल. यामध्ये शेतकरी, सरकारी व बेरोजगार तरुण महत्वाची भूमिका बजावतील._x000D_ _x000D_ _x000D_ संदर्भ – Agrostar, 3 मार्च 2020 _x000D_ _x000D_ ही महत्वपूर्ण माहिती आवडल्यास लाइक अन् शेअर करा. _x000D_
572
0
इतर लेख