PM शेतकरी सन्मान निधी योजनेचे २ हजार न जमा होण्याची कारणे पहा.
कृषी वार्ताडेलिहंट
PM शेतकरी सन्मान निधी योजनेचे २ हजार न जमा होण्याची कारणे पहा.
मोदी सरकारकडून छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र काही कारणास्तव हे पैसे अडकू शकतात. चिंतेचं कारण नाही कारण सरकारकडून हे पैसे रोखले जात नसून शेतकऱ्यांच्या काही छोट्या चुकीमुळे हे पैसे अडकत आहेत. अनेक शेतकऱ्यांना नाही मिळाला फायदा अद्याप असेही काही शेतकरी आहेत, ज्यांना या योजनेचा फायदा मिळालेला नाही. त्यांनी अर्ज करूनही ही मदत मिळालेली नाही. कृषी विभागाने केंद्र सरकारकडे पाठवलेल्या काही फॉर्ममध्ये PFMS द्वारे निधी हस्तांतरित करताना अनेक चुका आढळल्या आहेत, ज्यामुळे हप्त्याची रक्कम हस्तांतरित होत नाही आहे. या प्रकरणात तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्याची आवश्यकता आहे. वाचा काय आहेत चुका🤔 • शेतकऱ्यांना नाव इंग्रजीमध्ये लिहिणं आवश्यक आहे, तुम्ही इतर भाषेत नाव लिहिलं असेल तर ते बदलणं गरजेचं आहे. • शेतकऱ्याचं खातं आणि अर्जावरील नावात कोणतीही स्पेलिंग मिस्टेक असता कामा नये • बँकेचा IFSC कोड लिहण्यासाठी कोणतीही चूक करू नका • बँक खात्याची माहिती देतानाही कोणतीही चूक करू नका • तुमचा पत्ता, गावाच्या नावाची स्पेलिंग देखील योग्यपणे तपासा ऑनलाइन कशाप्रकारे सुधाराल चुका? तुम्ही या चुका आधारच्या साहाय्याने दुरुस्त करू शकता. सर्वात आधी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर जावं लागेल. त्याठिकाणी फार्मर्स कॉर्नरवर जाऊन क्लिक करा. त्याठिकाणी आधार एडिटची एक लिंक दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. त्यानंतर जे पेज ओपन होईल त्याठिकाणी तुम्ही आधार क्रमांक दुरुस्त करू शकता, तर खातेक्रमांक चुकीचा असेल तर तो देखील सुधारू शकता. शिवाय तुम्ही कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी देखील संपर्क करू शकता. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- डेलिहंट हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
15
इतर लेख