AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
PM किसानचे 2000 रुपये मिळाले नाहीत? इथे संपर्क करा आणि नोंदवा तक्रार!
कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
PM किसानचे 2000 रुपये मिळाले नाहीत? इथे संपर्क करा आणि नोंदवा तक्रार!
➡️ तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि अद्याप तुम्हावा मोदी सरकारने या योजनेअंतर्गत पाठवलेला हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तरी ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 14 मे रोजी मोदी सरकारने या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही रक्कम हस्तांतरित केली. ➡️ या योजनेचे लाभार्थी असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा झाले आहेत. तुम्ही त्या शेतकऱ्यांपैकी असाल, ज्यांना अद्याप मदत मिळालेली नाही, त्यांनी चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही. सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार दाखल करून शकता. याशिवाय तुम्ही तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता. ➡️ अनेकदा सरकारकडून पैसे पाठवले जातात मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे पोहोचत नाहीत. यामध्ये काही तांत्रिक कारणं देखील असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांनी प्रविष्ट केलेला आधार क्रमांक आणि खाते क्रमांक यामध्ये गोंधळ असल्यास ते पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. 2000 रुपये मिळवण्यासाठी इथे करा तक्रार👇 ➡️ या योजनेसंदर्भात तक्रार करण्यासाठी तुम्ही लेखापाल किंवा कृषी विभागाच्या संपर्क करू शकता आणि त्यांना सविस्तर माहिती देऊ शकता. तिथे तुमचं काम न झाल्यास या योजनेकरता सरकारने काही हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही तक्रार करू शकता. या क्रमांकावर करा संपर्क👇 ➡️ पीएम शेतकरी सन्मान टोल फ्री नंबर असणाऱ्या हेल्पलाइन नंबर 011-24300606 / 011-23381092 यावर संपर्क करू शकता. याशिवाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत पीएम-किसान हेल्प डेस्क (PM-KISAN Help Desk) चा ई-मेल (Email) pmkisan-ict@gov.in यावर देखील संपर्क करू शकता. ➡️ पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
45
21
इतर लेख