AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पपई - रिंग स्पॉट व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय:
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पपई - रिंग स्पॉट व्हायरस प्रतिबंधात्मक उपाय:
पपई पिकात रोग प्रसार होण्याच्या सुरुवातीला नवीन पानांवर पिवळेपणा दिसून येतो व पानांचा आकार बदलून शिरा जास्त ठळकपणे दिसून येतात तसेच फळांवर गर्द हिरव्या रंगाच्या रिंग तयार झालेल्या दिसतात. हा विषाणूजन्य रोग मावा या किडीपासून पसरवला जातो. यावर उपाययोजना म्हणून पपई पिकाची लागवड फेब्रुवारी ते मार्च महिन्यात करावी. तसेच पपई बागेच्या कडेला चारही बाजूंना मका अथवा मधुमका पीक करावे जेणेकरून मावा कीड मका पिकाकडे आकर्षित केली जाईल. फवारणी साठी निमार्क @ २ - ३ मिली किंवा थायोमिथोक्साम @ ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
158
4