AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वडिलोपार्जित जमीन बाहेरच्या व्यक्तीस विकता येणार नाही
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
वडिलोपार्जित जमीन बाहेरच्या व्यक्तीस विकता येणार नाही
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच 'वडिलोपार्जित कृषी जमीन' विषयी मोठा निर्णय घेतला आहे. जर वारसदाराला वडिलोपार्जित कृषी जमीनचा एक हिस्सा विकायचा असेल, तर त्याला घरच्या व्यक्तीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. वारसदार आपली मालमत्ता कोणत्याही बाह्य व्यक्तीला विकू शकत नाही. कारण जस्टिस यूयू ललित व एमआर शाहच्या पीठने हा निर्णय हिमाचल प्रदेशच्या एका प्रकरणसंबंधी दिला आहे. या प्रकरणात याचिका दाखल करण्यात आली आहे की, कृषी जमीनचा समावेश कलम 22 च्या तरतुदींमध्ये आहे. कलम २२ मध्ये तरतूद आहे की, मृत्यूपत्र न लिहिता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या मालमत्तेवर वारसदार असतात. या वारसदाराला आपला हिस्सा विकायचा असेल, तर त्याला आपल्या इतर वारसदारांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. पीठने सांगितले की, कृषी जमीन देखील कलम २२ च्या तरतुदींनुसारच लागू होईल. त्याचबरोबर या तरतुदीचा हेतू असा आहे की, कुटुंबातील संपत्ती बाहेरच्या व्यक्तीकडे न जात वारसदारालाच मिळाली पाहिजे.
हे प्रकरण असे आहे की, लाजपतच्या मृत्युनंतर त्यांची संपत्ती नाथू आणि संतोष या त्यांच्या दोन मुलाला मिळाली. संतोषने आपल्या नावावर असलेल्या एक हिस्सा बाहेरच्या व्यक्तीला विकल्यामुळे नाथूने वारसदार या कायदयाच्या अंतर्गत कलम २२ या तरतुदीनुसार याचिक दाखल केली आहे की, कलम २२ च्या अंर्तगत ही संपत्ती कुटुंबातील व्यक्तीला घेण्याचा अधिकार आहे. संदर्भ – दैनिक भास्कर, १६ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
652
0