क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकातील तुडतुडे किडीचे नियंत्रण!
वर्षभर भेंडीचे पीक घेतले जाते. या पीक कालावधीमध्ये पिकात विविध किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. यांपैकी हिरव्या तुडतुड्यांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव दिसून येतो. चला तर मग या किडीबद्दल जाणून घेऊया. • हा किडीचा रंग हिरवा असून सर्व शेतकरी या किडीस चांगलेच ओळखू शकतात. • भेंडी पिकांबरोबरच हि कीड कापूस, बटाटा, वांगे, टोमॅटो इत्यादी पिकांनाही नुकसान करते. काही पिकांमध्ये हे विषाणूजन्य रोग पसरवते. • या किडीची पिल्ले आणि प्रौढ दोघेही हिरवे व त्रिकोणाकार असतात. • हि कीड मुख्यतः पानांच्या मागच्या पृष्ठभागावर राहते. • बाल्य/पिलू अवस्थेत या किडींना पंख नसतात परंतु प्रौढ किडींना असल्याने हे पूर्ण पिकामध्ये प्रादुर्भाव करतात. • किडींनी पानातून रसशोषण केल्याने पानाच्या कडा पिवळ्या होऊन वरच्या दिशेने वळतात त्यामुळे पानांचा आकार वाटीसारखा दिसतो. • अशी प्रादुर्भाग्रस्त पाने कालांतराने सुकुन गळून पडतात. • या प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे हे जाणून घेण्यासाठी पिकामध्ये चिकट सापळे बसवावेत. • आपल्या पिकात किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच निमार्क (१% ईसी) @2० मिली किंवा लसूण अर्क ५०० ग्रॅम किंवा व्हर्टिसिलियम लॅकॅनी हि बुरशी आधारित पावडर @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • अधिक प्रादुर्भाव असल्यास याच्या नियंत्रणासाठी, बुप्रोफेंझिन ७० डीएफ @ ५ मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ ईसी @ ५ मिली किंवा थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी @ ४ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @ ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
38
0
संबंधित लेख