सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा लागवड व्यवस्थापन
• कांद्याची लागवड करताना उत्तम निचऱ्याची किंवा मध्यम जमिनीची निवड करावी रोपांची लागवड १५*१० सेंमी अंतरावर लागवड करावी.त्यानंतर हळूवारपणे पाणी द्यावे.
• लागवडीच्या वेळी कांद्यास एकरी ५० किलो युरिया, ५० किलो १८:४६ , ५० किलो पालाश तसेच १० किलो सल्फर द्यावे. तसेच १ महिन्यानंतर ५० किलो युरियाचा दुसरा हप्ता कांद्याला प्रती एकरी द्यावा.
• लागवडी नंतर १५ दिवसांनी शिफारशी नुसार तणनाशकाची फवारणी करून त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करून घ्यावी
• लागवडी नंतर कांद्यावरील किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन कीटकनाशकाची व बुरशीनाशकाची फवारणी करावी.
• लागवडी नंतर दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने कांद्याला पाणी द्यावे ९० दिवसांनी कांद्याचे पाणी तोडावे.कांद्याच्या माना नैसर्गिकरीत्या ५० टक्के पडल्यानंतर कांदा काढणीस सुरवात करावी.
• कांदा व्यवस्थितपणे सावलीत झाकून कांदा मानेपासून एक इंच अंतरावर कापावा. व त्यानंतर १५ दिवस सावलीत ठेवावा.
• साठवणगृह स्वच्छ करून त्यामध्ये सारख्या आकाराचे कांदे साठवणूक करून ठेवावे.कांदा साठवणुकीपूर्वी दोन दिवस आधी कांदा साठवणगृहात मॅन्कोझेबची २ ते २.५ ग्राम प्रती लिटर पाण्यात फवारणी केल्यास कांदा खराब होण्याचे प्रमाण कमी राहते.
अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस ९ सप्टेंबर १८